इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
हवामान विभागाने (IMD) आजराज्यात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. ताज्या अहवालानुसार, कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवसांत जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.
तसेच आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर या भागातील घाट परिसरातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. या भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, नदी-नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम सरी पडतील. यंदा मराठवाड्यात पावसाची कमतरता जाणवत असून, पुढील 3 ते 4 दिवसांत परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.
विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली येथेही जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. ज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.