Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजरस्त्यावरील खड्डे देत आहेत अपघातांना निमंत्रण !! केडगाव प्रतिनिधीः गणेश सुळ

रस्त्यावरील खड्डे देत आहेत अपघातांना निमंत्रण !! केडगाव प्रतिनिधीः गणेश सुळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दौंड (पुणे): दौंड तालुक्यातील पिंपळगाव ते खुटबाव (गलांडवाडीफाटा) रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यासाठी अनेक वेळा प्रशासनाला कळवून देखील अद्याप अनेक वर्षापासून याकडे दुर्लक्ष आहे. सद्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यांची खोली वाढत असून वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक अपघात याठिकाणी झाले आहेत.

प्रशासनाकडून काही वेळा तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र काही दिवसातच ती उखडते आणि पुन्हा तीच स्थिती निर्माण होते. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सुरक्षित प्रवासासाठी व अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपययोजना राबविण्याची मागणी स्थानिक नागरीक वाहनचालक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रस्त्याची कायम स्वरुपी उपाययोजना करावी. कारण या रस्त्याने हजारो नागरिक दररोज प्रवास करत असतात. नजिकच् मोठे कॉलेज असल्याने विध्यार्थी याच रस्त्याने प्रवास करताना अनेक अपघात देखील घडले आहेत. पुढील काळात असा कुठलाही अपघात प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments