Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजया झोपडीत माझ्या' सुंदर संकल्पनेतून साकारला गणेशोत्सवाचा देखावा... अॅड. अश्विनी जगताप

या झोपडीत माझ्या’ सुंदर संकल्पनेतून साकारला गणेशोत्सवाचा देखावा… अॅड. अश्विनी जगताप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : यावर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी आणि एकूणच कुटुंबासाठी जास्तच खास ठरला. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी गणपतीत कसे डेकोरेशन करावे याचा विचार करत होते आणि एक दिवस सुचलं. ‘वाढते शहरीकरण आणि आत्ताच्या पिढीला पडणारा ग्रामीण संस्कृतीचा विसर’ याचा विचार करून आम्ही यावर्षी ग्रामीण संस्कृती हा विषय गणपती डेकोरेशनसाठी निवडला. घरातच 8*8 ची झोपडी आम्ही उभी केली आणि या छोट्याशा झोपडीत 60-70 वर्षांपूर्वी असणारा संसार, तांब्या-पितळेची, लाकडाची भांडी, सारवलेली झोपडी. घरातल्या माणसांना माणसांबरोबरच अंगणातल्या प्राण्यांसोबत देखील गुण्यागोविंदाने नांदायला शिकवणारी ही ग्रामीण संस्कृती…

घरातच छोटीशी झोपडी उभी करताना अनेक जुन्या आठवणींनाउजाळा मिळाला. पूर्वी एवढ्याशा झोपडीत इतकं सगळं कसं मावायचंहे अनुभवता आलं. भांडीकुंडी, कपडे, धान्य, भाज्या, चूल, लाकूडफाटा, घरातली माणसं आणि बरचं काही. हा झोपडीतला संसार उभाकरताना अनेक बारकावे लक्षात आले. झोपडीत टांगून ठेवलेल्याकांदा लसणाच्या पेंड्यांपासून ते अगदी अंगणातल्या तुळशीपर्यंतसगळ्या गोष्टी अतिशय सुबकपणे मांडल्या. झोपडीत छोटीशी वलन,वलनीवर नऊवारी लुगडं, चोळी, कोपरी, उपरणं, जुनी पत्र्याची पेटी,हंडा, तपेली, पातेली यांच्या उतरंडी, पितळेचा कुकर, पितळेचा तीनतळी डबा, मसाल्याचा डबा त्याचबरोबर जुन्या घडणीचे पितळेचे तांबेताट-वाट्या, कढई, लाकडी सोऱ्या, खिसणी, तांब्याचं धान्याचं माप,तांब्याचं घंघाळ, जातं, पाटा-वरवंटा, मुसळ, जुना रॉकेल वर चालणाराकंदील, सुप, धान्याची चाळण, टोपलं, शिंकाळ अशी खूप सारी जुनीआणि नवी प्रेमाने जपलेली संपत्ती.

ही भांडी साफ करताना…

माझी दोन्ही मुलं : मम्मा आपण किती श्रीमंत आहोत.

मी: का असं विचारताय?

मुलंः आपल्याकडे एवढी सगळी सोन्याची भांडी आहेत, हो ना? मीः हो अगदी खरं श्रीमंतच आहोत आपण. कारण आजकाल खूप कमी घरांमध्ये अशी जुन्या घडणीची तांब्या पितळेची भांडी पाहायला मिळतात.

अंगणात तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची गोधडी, त्याच्यावर खेळणारं छोटसं बाळ त्याच्या हातात लाकडी खुळखुळा. एका बाजूला तुळशीजवळ बसलेला मोत्या, जीवा- शिवाची बैल जोडी, कोल्हापुरी चपला, छोटासा रांजण, आणि दुधात साखर म्हणजे स्वामींवरील श्रद्धा लक्षात घेऊन नवऱ्याने अतिशय सुबक, सुंदर स्वामींच्या रूपातला गणपतीबाप्पा घरी आणला आणि तो माझ्या छोट्याशा झोपडीत आनंदाने विराजमान झाला. तो आला आणि घरात आनंदाला उधाण आलं. सगळं त्याच्याचसाठी. पण आपण कोण करणारे, तोच कर्ता- करविता. तो सगळ आपल्याकडून अगदी लाडाने करवुन घेतो. त्याच्यासाठी रोज वेगळा नैवेद्य बनवणं, सकाळ संध्याकाळ घरात आरती, धुप-दिपांचा मंत्रमुग्ध करणारा सुवास घंटानाद घर कसं अगदी प्रसन्नतेने भरून केलं होतं.

दरवर्षीप्रमाणे गणपतीत घरी सत्यनारायणाची पूजा घातली. त्यादिवशी संपूर्ण दिवस आम्ही पूर्ण कुटुंबाने गावाकडची वेशभूषा केली. फक्त डेकोरेशन म्हणूनच नाही तर एक दिवस आम्ही गावाकडचं आयुष्य देखील भरभरून जगलो आणि एवढं सगळं केलं आहे तर मग मस्त फोटोशूट देखील केलं… शास्त्र असतं ते.

अकरा दिवस कसे सरले कळलच नाही, आता रिकामा झालं घर, रितं झालं मखर….

पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी, निघाला लंबोदर, गणपती बाप्पा मोरया

अॅड. अश्विनी सचिन जगताप, उरुळी कांचन, ता. हवेली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments