इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
यवत (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाच्या पथकाने दोन ठिकाणी धडक कारवाई केली. यावेळी 10 लाख 69 हजार 410 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 2 लाख 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल उद्धवस्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणीगाडा परिसरात हि कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाच्या वतीने यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे हिंगणीगाडा, येथे अवैधरीत्या गावठी दारूचा साठा असल्याबाबत माहिती मिळाली होती. हि माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाच्या पथकाने छापा टाकून धडक कारवाई केली.
या कारवाईमध्ये गावठी हातभट्टी दारूचे 35 लिटर क्षमतेचे एकूण 80 कॅन नष्ट करण्यात आले असून एकूण 2 लाख 96 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल उद्धवस्त केला आहे. दुसऱ्या कारवाईत अवैधरित्या देशी विदेशी मद्याची वाहतूक व विक्री करताना एका चारचाकी वाहनासह एकूण 10 लाख 69 हजार 410 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हि कारवाई निरीक्षक विजय रोकडे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, जवान नि. वाहन चालक केशव वामने, जवान अशोक पाटील, जवान संकेत वाजे, जवान सौरभ देवकर, जवान सागर दुबळे, जवान प्रवीण सूर्यवंशी यांनी केली आहे.