Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजमोठी बातमी ! छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली; विशेष विमानाने पुण्याहून...

मोठी बातमी ! छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली; विशेष विमानाने पुण्याहून मुंबईला हलवले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ आज (दि.26) पुण्यात होते. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्याहून विशेष विमानाने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

छगन भुजबळ यांना गुरुवारी (दि. २६) सकाळपासून अस्वस्थ वाटू लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा नियोजित दौरा होता. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान महात्मा फुले यांचे स्मारक असलेल्या भिडे वाड्याला भेट देणार होते. त्यासाठी मंत्री छगन भुजबळ पुण्यात उपस्थित होते. दुपारनंतर भुजबळ यांना ताप वाढला. त्यांना घशाचे इन्फेक्शन झाल्याचा संशय होता. भुजबळांना बोलण्यासाठी देखील त्रास होत होता. त्यानंतर वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने एअर अॅम्बुलन्सद्वारे मुंबईला हलविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments