Thursday, July 10, 2025
Homeक्राईम न्यूजमृत्यूनंतर सोशल मीडियाचं काय? आता सोशल मीडियासाठीही निवडावा लागणार 'वारसदार'

मृत्यूनंतर सोशल मीडियाचं काय? आता सोशल मीडियासाठीही निवडावा लागणार ‘वारसदार’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबईः आयुष्यात कमावलेल्या संपत्तीचं काय होतं, हे आपल्याला माहीत आहे. मृत्यूनंतर बँक खाती, मालमत्ता यांसाठी कायदेशीर वारस ठरवलेला असतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, कोणाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचं काय होतं? तुमचे फेसबुक पोस्ट, इन्स्टाग्राम फोटो, व्हिडीओ आणि त्यातील आठवणींचं काय होतं? याच महत्त्वाच्या प्रश्नावर आता सोशल मीडिया कंपन्यांनी एक खास अपडेट आणली आहे. आता सोशल मीडिया लिगसी कॉन्टॅक्ट म्हणजे एक असा पर्याय, जिथे मृत्यूनंतर सोशल मीडिया अकाउंट कोण सांभाळेल, हे आधीच ठरवून ठेवू शकता. ‘डिजिटल वारस’ निवडण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

फेसबुक, गुगल आणि इन्स्टाग्रामसारखे मोठे प्लॅटफॉर्म युझर्सना त्यांच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला “Legacy Contact” म्हणून निवडण्याची सोय देतं. ती व्यक्ती प्रोफाइल फोटो बदलू शकते, श्रद्धांजली पोस्ट टाकू शकते, किंवा प्रोफाइलवर श्रद्धांजलीचा संदेश लिहू शकते. निधनानंतरही मित्रांना आणि कुटुंबियांना आठवणींशी जोडलेले राहणे शक्य झाले आहे.

या सुविधेचा वापर करून, तुम्ही तुमच्या सोशल मीडिया खात्यावरील माहिती, आठवणी आणि तुमच्या डिजिटल डेटावर तुमच्या विश्वासू व्यक्तीला मर्यादित अधिकार देऊ शकता. यामुळे निधनानंतरही आठवणी जतन करता येतील. फेसबुक, गुगल आणि इन्स्टाग्रामसारखे मोठे प्लॅटफॉर्म आता हे फीचर उपलब्ध करून देत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments