इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावातएका शेतकऱ्याच्या घरासमोरून होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी आत्माराम खंडेराव फराटे (वय ५५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. मांडवगण फराटा) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलैच्या रात्री ८.३० वाजता ते २५ जुलैच्या सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरून त्यांची एम एच १२ एफ व्ही ६१९६ क्रमांकाची होंडा शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार खबाले हे करत आहेत.