इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दिल्लीः संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीबद्दल सांगितले आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराच्या सामर्थ्यावर विशेष भर दिला. ते म्हणाले, “संपूर्ण जगाने भारताच्या लष्करी सामर्थ्याचे, भारतीय सैन्याच्या ताकदीचे रूप पाहिले आहे. भारतीय सैन्याने ठरवलेले १०० टक्के लक्ष्य साध्य केले. शत्रूच्या घरात घुसून, दहशतवादी अड्डे केवळ २२ मिनिटांत उद्ध्वस्त केले.” त्यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचेही कौतुक केले. त्यांनी “देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आले असून, महागाईचा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरला आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
“आर्थिक क्षेत्रात, जेव्हा तुम्ही सर्वांनी आम्हाला २०१४ मध्ये जबाबदारी दिली होती. २०१४ पूर्वी, आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होतो. आज, भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.”
पंतप्रधान मोदींनी देशाच्या आर्थिक प्रगतीवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “२०१४ पूर्वी देशात असा एक काळ होता, जेव्हा महागाईचा दर दोन अंकी होता. आज, हा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरला आहे. पावसाळी अधिवेशन कोणत्या मुद्यांनी रंगणार ते पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.