Saturday, August 2, 2025
Homeक्राईम न्यूजबिबवेवाडीत मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून; आरोपीला पोलिसांकडून अटक

बिबवेवाडीत मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून; आरोपीला पोलिसांकडून अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे, १४ जुलै : दारू पिऊन त्रास देत असल्याच्या रागातून मोठ्याभावाने लहान भावाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१४ जुलै) सकाळी बिबवेवाडी परिसरातील गणेशनगर येथे घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

खून झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २४, रा. गणेशनगर, बिबवेवाडी) असे आहे, तर आरोपीचे नाव अनिकेत दत्तात्रय नवले (वय २६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे असून तो प्रवीणचा सख्खा मोठा भाऊ आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रवीणला दारू पिण्याचे व्यसन होते आणि तो कोणतेही काम करत नव्हता. सतत घरात त्रास देत असल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा वाद झाला आणि रागाच्या भरात अनिकेतने घरातच चाकूने प्रवीणवर वार केला.

प्रवीण गंभीर जखमी झाला होता. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत नवलेला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments