इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहराच्या येरवड्यातील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील ५ अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या मुलाला हाताने मारहाण करून टॉवेल फाडून त्याच्या काठाच्या दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत संतोष किसन कुंभार (वय ४९ वर्ष, रा. चहोली फाटा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदरची घटना पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील बराक क्रमांक २ मध्ये मंगळवार (१० जून) रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी कृती केलेल्या अल्पवयीन मुलांना पंडित जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात ठेवले जाते. या केंद्रातील बराक २ मधील एका १७ वर्षाच्या मुलाने बाथरुम साफ करण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन त्याचा इतर मुलांशी वाद झाला. तेव्हा ५ अल्पवयीन मुलांनी या १७ वर्षीय मुलाला हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यानंतर टॉवेल फाडून त्याच्या काठाच्या दोरीने त्याचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा भयंकर प्रकार समोर येताच तेथील सुरक्षारक्षकाने ‘या’ मुलाला वाचविले.
दरम्यान, येरवडा पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करीत आहेत.