इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील खडकवासला येथील एनडीएमधील थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (दि. ४) करण्यात आले. यावेळी ळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते उपस्थित होते.
अनावरणाप्रसंगी अमित शाह यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी पुण्यातून एल्गार पुकारला होता. १७ व्या शतकात पुण्यातून स्वातंत्र्याचा हुंकार पुकारण्यात आला. थोरले बाजीराव पेशवेंचा पुतळा माझ्याही गावात आहे. पुणे स्वराज्याच्या संस्काराचे उगमस्थान आहे. बाजीरावांची प्रेरणा अनेका मिळत राहिल. त्यामुळे त्यांचा पुतळा होण्यासाठी एनडीएचीच जागा योग्य आहे.’
शहा पुढे म्हणाले की, ‘बाजीराव यांच्या पुतळ्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल. काही युद्धनीती कालबाह्य होत नाहीत. सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांची युद्धनीती यामध्ये साम्य आहे. बाजीरावांनी २० वर्षांत ४१ लढाया लढून त्या सर्व जिंकल्या. पराभव निश्चित मानल्या जाणाऱ्या लढाया बाजीरावांनी जिंकल्या. त्यामुळे त्यांच्यासारखा सेनापती दुसरा नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेले. त्यांनी मिळविलेला विजय कल्पने पलिकडचा होता. अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याच कौतुक केलं आहे.