Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजबहिणीला देत होता त्रास; भावाने साथीदारांच्या मदतीने दाजीचा काढला काटा; जुन्नर येथील...

बहिणीला देत होता त्रास; भावाने साथीदारांच्या मदतीने दाजीचा काढला काटा; जुन्नर येथील घटनेने खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आळेफाटा : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीला त्रास देतो म्हणून दाजीच्या डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील आळे (ता. जुन्नर) गावच्या परिसरात असलेल्या फाऊंटन हॉटेलच्या पाठीमागे घडली आहे. या प्रकरणी नाजूक भांडवलकर हिने आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, आरोपी हा उज्जैन, मध्य प्रदेश येथे पळून जाणाच्या तयारीत असतानाच आळेफाटा पोलिसांनी मेव्हण्याला अटक केली आहे. गणेश दादाभाऊ मदने (वय-२४, रा. रामवाडी, खापरवाडी, ता. जुन्नर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर कैलास महादू भंडलकर (वय-३२ रा. मोरदरा, वडगाव आनंद, ता. जुन्नर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील आळे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत असलेल्या एका फाऊंटन हॉटेलच्या मागील बाजूस मोरदरा रोडलगतच्या आतमध्ये एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. आरोपीची ओळख पटविण्यासाठी तसेच त्याची माहिती काढण्यासाठी पोलिस पथके तयार केली. दरम्यान, मृत व्यक्तीला त्याच्या कपड्यावरून तसेच चप्पलवरून त्याची पत्नी नाजुका भंडलकर हिने ओळखले. त्यानंतर मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. त्यानंतर त्याच्या डोक्यात अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोपीला ठोकल्या बेड्या

दरम्यान, या गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी शोध मोहीम पथके तयार करून तपास सुरू केला असता, आरोपी उज्जैन मध्य प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.

म्हणून केला खून

आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता कैलास महादृ भांडवलकर हा माझ्या बहिणीचा नवरा आहे. तो तिला सतत त्रास देत होता. तसेच त्याला समजावून सांगितले, तरीदेखील तो ऐकत नव्हता. त्यामुळे मी त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments