इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
इंदापूर : बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीसांनी एन्काऊंटर केला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र पोलिसांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंदापूर पोलिस ठाण्यात अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. बदलापूर आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या व त्यामधे त्याचा मृत्यू झाला.
या घटनेचा विरोधक भांडवल करून पोलिसांना टार्गेट करत आहे आणि त्यांच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सीमा प्रशांत कल्याणकर यांच्या वतीने महाराष्ट्र पोलिसांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंदापूर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व सर्व पोलीस अधिकारी वर्ग यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सीमा कल्याणकर म्हणाल्या, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आपले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही शिवसेना आहे. आम्ही महिला व मुलींवर होणारे अत्याचार सहन करुन घेणार नाही. असे सांगून त्यांनी महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख आण्णा काळे, तालुका प्रमुख रामचंद्र जामदार, तालुका संघटक विजय पवार, शहर प्रमुख शुभम जामदार, महिला पदाधिकारी रूपाली रासकर, कमल लोंढे व
तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.