Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजफोनवर बोलणं आलं अंगलट; बोलण्याच्या नादात घरासमोरून गेलेली विजेची तार पकडल्याने तरुणाचा...

फोनवर बोलणं आलं अंगलट; बोलण्याच्या नादात घरासमोरून गेलेली विजेची तार पकडल्याने तरुणाचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवर बोलत असताना एका तरुणाने घरासमोरून गेलेली विजेची तार पकडल्याने त्याला विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळच्या सुमारास मोशीतील जाधववाडी परिसरात घडली. रामब्रज हरिसिंग तेगोर (वय-22, पडवळनगर, थेरगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामब्रज हे फरशी बसविण्याचे काम करण्यासाठी जाधववाडी मोशी येथे आले होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रामब्रज यांना फोन आला. फोनवर बोलण्यासाठी ते गॅलरीमध्ये गेले होते. या घरासमोरून विज वाहक तार गेली होती. बोलताना अचानक रामब्रज यांनी विजेची तार हातात पकडली.

यामध्ये विजेचा जोरदार धक्का बसून ते खाली पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments