इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे आणि लोणावळा दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षापासून असलेली तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकची मागणी आता पूर्ण झाली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे सेवा अधिक वेगवान आणि सक्षम होणार आहे. नवीन मार्गिकांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, कारण यामुळे गाड्यांची संख्या वाढेल आणि एक्सप्रेस गाड्यांचाही वेग वाढेल.
केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी प्रत्यक्ष भेटून त्यांनी मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार समान प्रमाणात उचलणार आहेत. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा लोकलवर अवलंबून असलेल्या नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होईल. अखेर या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. दरम्यान, यामुळे पुणे-लोणावळा प्रवासातील वेळ वाचणार असून, वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे-लोणावळा लोकल सेवा अधिक मजबूत होईल, ज्यामुळे अनेक वर्षांपासूनची प्रवाशांची समस्या सुटण्यास मदत होईल.