Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात वसतिगृहामधील २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; इतर विद्यार्थ्यांनी केले गंभीर आरोप

पुण्यात वसतिगृहामधील २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; इतर विद्यार्थ्यांनी केले गंभीर आरोप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे महापालिकेच्या वसतिगृहामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार घोले रोडवरील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात उघडकीस आला आहे. दरम्यान, या घटनेने विद्यार्थ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

घोले रोडवरील असलेल्या महानगर पालिकेच्या डॉक्टर आंबेडकर वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बाब समोर आली आहे. या विध्यार्थ्यांचा मृत्यू डेंग्यू आणि कावीळ या आजारामुळे झाला आहे. वसतिगृहामध्ये असतानाच त्यांना डेंग्यू आणि कावीळ हा आजार झाला होता. महानगरपालिका प्रशासनाच्या वसतिगृहातील निष्काळजीपणा आणि अस्वच्छतेमुळे दोन विद्यार्थ्यांचा या आजारांमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणातील संबंधित वसतिगृहात अत्यंत अस्वच्छता असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. वसतिगृहात स्वच्छता नसल्यामुळे पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊन त्याचा संसर्ग संपूर्ण वसतिगृहात पसरला आहे. आतापर्यंत 19 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाली आहे.

याबाबत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) पुणे शहर- जिल्ह्याचे महासचिव कृष्णा साठे म्हणाले की, दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना दुःखदायक आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणसाठी येणाऱ्या व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीकडे, सोयीसुविधाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष्य नाही ही गंभीर बाब आहे.

२ विद्यार्थी मृत्युमुखी पडत असतील तर प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे. दोन्ही मृत विद्यार्थ्यांच्या परिवारास तत्काळ १० लाख रुपयांची मदत द्यावी. तसेच, या घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करण्यात यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments