इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, प्रत्येक भागातून रोज नवीन घटना समोर येत आहेत. नुकतीच एक घटना समोर आली ज्याने पुन्हा एकदा पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात गुंडांनी पुन्हा धुडगूस घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
कात्रज परिसरात 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणावर तलवारी आणि कोयत्याने वार करण्यात आला. ओंकार साबळे असं हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कात्रज कोंढवा रोड परिसरात असणाऱ्या एसबीआय बँकेसमोर ही घटना घडली. ओंकारवर हल्ला केल्यानंतर गुन्हेगार हातात तलवारी आणि कोयता नाचवत पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सहकारनगर परिसरात तळजाई वसाहतीतील अल्पवयीन मुलावर दुचाकीवरून आलेल्या तिघांकडून कोयत्याने वार करण्यात आला होता. ज्यात तरुण गंभीर जखमी झाला होता, भरदिवसा ही घटना झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले होते. या घटनेला दोन दिवसचं झाले आहेत. तोपर्यंत कात्रज परिसरातून ही घटना समोर आली आहे. पुण्यात दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असून, सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.