Saturday, September 13, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात जादूटोण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक, अंगाऱ्याचा पेढा खायला दिला अन्...

पुण्यात जादूटोण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक, अंगाऱ्याचा पेढा खायला दिला अन्…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पाण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच आता नुकतीच एक घटना समोर आली आहे ज्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सहकारनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला जादूटोण्याच्या नावाखाली ३ लाख १५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गिरीश बलभीम सुरवसे (वय ३६ वर्षे) या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला विश्वासात घेऊन मंदिरात नेले आणि तिथे मंत्रोच्चार व अघोरी विधींचा देखावा करत तिची फसवणूक केली. या ढोंगी बाबान महिलेला अंगाऱ्याचा पेढा खाण्यास दिला, नंतर महिलेच्या भीतीचा गैरफायदा घेत सोन्याचे दागिने आणि रोख मिळून ३ लाख १५ हजार रुपये घेतले.

महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अशा फसव्या व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे आणि जादूटोण्याला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments