Saturday, August 2, 2025
Homeक्राईम न्यूजपुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ ! १ मिनिट उशीर झाल्याने विद्यर्थ्यांना प्रवेश...

पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ ! १ मिनिट उशीर झाल्याने विद्यर्थ्यांना प्रवेश नाकारला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : परिक्षा हॉलच्या बाहेर विद्यार्थ्यांना धक्काबुक्की झाल्याची घटना समोर येत आहे. या घटनेवर पालकांनी संताप व्यक्त केला असून, परीक्षा हॉलच्या बाहेर पालकांचा गोंधळ सुरु आहे. आज पुण्यात मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाची परीक्षा होती.

परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना 1 मिनिटं उशीर झाल्याने त्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश नसल्यात आला. हा प्रकार हडपसर भागात असणाऱ्या रामटेकडी येथील N Digital झोन या केंद्रावर घडला. याठिकाणी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सकाळी 8.30 वाजेपर्यंत प्रवेश देण्याची वेळ होती. मात्र, काही दिद्यार्थ्यांना एक मिनिट उशीर झाल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तसेच सुरक्षारक्षकांकडून विद्यार्थ्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली.

या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुरक्षारक्षक विध्यार्थ्यांवर ओडताना दिसत तसेच विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केल्याचं देखील दिसत आहे.

दरम्यान, फक्त एक मिनिट उशीर झाल्याने मुलांना परीक्षेला मुकावे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments