इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने म्हाडाची लॉटरी जाहीर केली असून एकूण 4186 घरांसाठी सोडतीची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
या सोडतीत विविध योजनांअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 219 घरे, म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 1683 घरे, सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 864 घरे तर सर्वसमावेशक योजनेअंतर्गत तब्बल 3322 घरे उपलब्ध होणार आहेत.
पुण्यातील घरांच्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. या दिवशीपासून अर्ज स्वीकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे लागणार असून 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत शुल्क भरता येईल.
या सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्राथमिक यादी 11 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होईल. त्यावर हरकती नोंदवण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2025 आहे. अंतिम यादी 17 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.
पुण्यातील घरांची सोडत 21 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. या दिवशी संध्याकाळी 6 वाजता अधिकृत वेबसाइटवर लॉटरीचा निकाल पाहता येईल. त्यामुळे अर्जदारांना घर मिळाले की नाही, याची माहिती थेट ऑनलाइन मिळणार आहे. पुणेकरांनी या सुवर्णसंधीचा लाभघेण्यासाठी दिलेल्या तारखांनुसार वेळेत अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.