Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे हादरले ! किरकटवाडीत तरुणावर कोयत्याने तब्बल ७१ वेळा वार, पहा रक्तरंजित...

पुणे हादरले ! किरकटवाडीत तरुणावर कोयत्याने तब्बल ७१ वेळा वार, पहा रक्तरंजित घटनेचा थरारक व्हिडिओ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर, हडपसरमधील वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनामुळे शहरातील वातावरण संवेदनशील बनले असतानाच गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात मंगळवारी (दि. ३) मध्यरात्री कोयत्याने वार करून तरुणाचा निघृण खून करण्यात आला, त्यापाठोपाठ किरकटवाडी परिसरात बुधवारी (दि. ४) सकाळी पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याचे तब्बल ७१ वार केल्याच्या रक्तरंजित घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

किरकटवाडीमध्ये बुधवारी सकाळी पूर्ववैमनस्यातून दोघा तरुणांनी एकावर कोयत्याचे तब्बल ७१ वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागर चव्हाण (वय २८) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा निघृण हल्ला केला व त्याला इंस्टाग्रामवर मुलीचे अकाउंट तयार करून सापळ्यात अडकवल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.

कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीमध्ये मे महिन्यात शुल्लक कारणावरून दोन टोळक्यांमध्ये झालेल्या भांडणातून श्रीनिवास वतसलवार (वय २४) याचा निघृण खून करण्यात आला. त्यामध्ये सागर चव्हाण आरोपी होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी श्रीनिवासाच्या मित्रांनी इंस्टाग्राम अकाऊंटच्या सहाय्याने सापळा रचला. त्यांनी एका मुलीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून चव्हाण याच्याशी संपर्क साधला. आरोपी गेले महिनाभर सागर याच्याशी त्या अकाऊंटवरून चॅटिंग करत होते. तो पूर्ण सापळ्यात अडकल्यावर आरोपींनी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याला किरकटवाडी फाटा परिसरात भेटायला बोलावले.

मुलीला भेटायचे असल्याचे समजून सागर तेथे गेला. त्या वेळी दबा धरून बसलेल्या दोघा आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. ऐन वर्दळीच्या वेळी भररस्त्यावर झालेल्या या हल्ल्याने नागरिक भयभीत झाले. कोयत्याचे वार वर्मी बसून सागर जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ही माहिती समजल्यावर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सागरला तातडीने रुग्णालयात दाखल केले. गंभीर गुन्ह्याची माहिती समजल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास जारी करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments