इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार रविवारी (दि. १५) उघडकीस आला. याच आवारातून दोन महिन्यांपूर्वीही चंदनाची पाच झाडे चोरट्यांच्या टोळीने कापून नेली. विद्यापीठाच्या आवारातील राष्ट्रीय खगोल भौतिकी केंद्राच्या (आयुका) आवारात चोरटे शनिवारी (दि. १४) मध्यरात्री घुसले. त्यांनी तेथील चंदनाच्या झाडाचे बुंधे पळवले.
शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विविध शासकीय संस्था, बंगले, सोसायटी तसेच शैक्षणिक संस्थांच्या आवारातून चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेली. या टोळीने पंधरवड्यापूर्वी मुकुंदनगर, मार्केटयार्ड परिसरातून तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), राजभवन तसेच खडकीतील दारूगोळा कारखान्यात शिरून चंदनाची झाडे कापून पळवली. मात्र, ही टोळी अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाही.