इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यात पीएमपी बस मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नंदा अशोक सुलाखे (वय ५७ वर्ष, रा. टिळेकरनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या बुधवारी (ता. १८) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान कात्रज येथील पीएमपी बस स्थानकाकडून येवलेवाडी बस स्थानकाच्या दिशेने जात होत्या. तेंव्हा अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील ७० हजार रुपयांची सोन्याची पाटली चोरून नेली.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करीत आहेत.