Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजपीएमपीएमएलने १७४८ बदली कर्मचाऱ्यांना केले सेवेत कायम; भानगिरे-देशमुखांमध्ये रंगली श्रेयवादाची लढाई

पीएमपीएमएलने १७४८ बदली कर्मचाऱ्यांना केले सेवेत कायम; भानगिरे-देशमुखांमध्ये रंगली श्रेयवादाची लढाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बदली कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचा आदेश बुधवारी (दि.१८) रोजी काढला. त्यामुळे पीएमपीएमएलच्या १७४८ कर्मचाऱ्यांना याचा लाभ झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपणून रखडलेला प्रश्न निकाली निघाला आहे. परंतु, आता राज्यात सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पीएमपीएमएलच्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित सामावून घेण्यासाठी आवश्यक असलेला २४० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला होता. पीएमपीएमएलच्या प्रशासनाकडून काही तांत्रिक कारणामुळे सेवेत पूर्णतः समावून घेतले जात नव्हते. अखेर १७४८ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येण्याबाबतचा आदेश पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी बुधवारी काढला.

पीएमपीएमएलच्या कर्मचारी सेवाशतीर्नुसार कर्मचाऱ्यास नोकरीत नियमित होण्याआधी २४० दिवस बदली कर्मचारी म्हणून सेवा बजवावी लागते. या कालावधीत कर्मचाऱ्याचे कामातील सातत्य प्रगती बघून त्यास सेवेत कायम करण्याबाबत निर्णय घेतला जातो. त्यानुसार २४० दिवसांचा कालावधी समाप्त झाला होता. हे कर्मचारी रोजदांरी पद्धतीने कार्यरतहोते. नियमित कर्मचाऱ्यांच्या इतकेच काम करुन सुद्धा सेवेची निश्चिती नसल्याने कर्मचारी सातत्याने आंदोलनाचा इशारा देत होते.

भानगिरे-देशमुखांमध्ये रंगली श्रेयवादाची लढाई

पीएमपीएमएलच्या १७४८ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पीएमपीएमएल १७४८ कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करण्याच्या विषयावरुन आता पुणे शहरात श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments