Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजपतीच्या निधनानंतर जवळीक वाढवून डॉक्टर महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल

पतीच्या निधनानंतर जवळीक वाढवून डॉक्टर महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे डॉक्टर महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या एकांतपणाचा गैरफायदा घेत, तिचे नकळत अश्लिल फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले. आरोपीच्या पत्नीने आपल्या पतीला मदत करून तिचे अश्लिल फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन त्यानंतर ते फोटो या महिला डॉक्टरच्या भावाला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी, हडपसर पोलिसांनी प्रतिक गलांडे (वय ३४ वर्ष) आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना ९ डिसेंबर २०२१ ते ७ जून २०२५ दरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या एकाकी पडल्या होत्या. आरोपी प्रतिक गलांडे याने त्यांच्या एकाकीपणाचा गैरफायदा घेऊन पीडितेशी जवळीक वाढविली. त्यानंतर पिडीत महिलेला लॉजवर नेऊन नकळत त्यांचे अश्लिल फोटो काढले. फिर्यादी महिला काम करीत असलेल्या क्लिनिक येथे वारंवार पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

दरम्यान, आरोपी प्रतिकच्या पत्नीने हे अश्लिल फोटो फेसबुकवर टाकण्याची व फिर्यादी महिलेच्या मुलीला उचलण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रतिकच्या पत्नीने हे अश्लिल फोटो फिर्यादी यांच्या भावाच्या व्हॉटस अॅपवर पाठवून त्यांची बदनामी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments