Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; जिल्ह्यात 26, 27 सप्टेंबर रोजी खासगी अवकाश...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; जिल्ह्यात 26, 27 सप्टेंबर रोजी खासगी अवकाश उड्डाणांना मनाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शिवाजीनगर-स्वारगेट मार्गाच्या मेट्रोचे काम पूर्ण झाले असून स्वारगेट ते कात्रज या मार्गाला मान्यता मिळाली आहे. भूमिगत मार्गाचे आणि नव्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 व 27 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभाही होणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या पुण्याच्या 27 सप्टेंबरच्या दौऱ्याबाबत मुख्य सचिवांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्तांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत दौऱ्यातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे. दौरा अंतिम झाल्यानंतर आणखी एक बैठक होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनावर शिक्कामोर्तब केला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

अवकाश उड्डाणांना मनाई

तसेच नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी पहाटे 12 वाजल्यापासून ते 27 सप्टेबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments