इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विजया गोरक्ष भोंडवे यांची आज (ता.०२) बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच साधना राजेनिंबाळकर यांनी दुसऱ्या सदस्याला उपसरपंच होण्याची संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज (ता. ०२) निवडणूक घेण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या सरपंच कमल कोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठीकीत उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान उपसरपंच पदासाठी विजया भोंडवे व मोहन सरके या दोन सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, मोहन सरके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अखेर विजया भोंडवे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे निवडणूक सहाय्यक व ग्रामपंचायत अधिकारी लहू जगदाळे यांनी जाहीर केले.
निवडीनंतर विजया भोंडवे यांचा मान्यवर व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.