Thursday, July 31, 2025
Homeक्राईम न्यूजधावत्या दुचाकीवर प्रेमी जोडप्याचे अश्लील चाळे कॅमेरात कैद; तरुणी तरुणाच्या मांडीवर अन्...

धावत्या दुचाकीवर प्रेमी जोडप्याचे अश्लील चाळे कॅमेरात कैद; तरुणी तरुणाच्या मांडीवर अन्…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरात एका प्रेमीयुगलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे, या व्हिडिओमध्ये दोन कपल गाडीवर अश्लील चाळे करताना दिसत आहेत. अशातच अनेकांना प्रश्न पडला आहे की. याला खरंच प्रेम म्हणायचं का? आणखीन काही… हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातला आहे.

या रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीवर एक तरुणी थेट पेट्रोल टॅकवर उलटी बसलेली दिवस आहे. आणि गाडी चालवणाऱ्या तिच्या प्रेमीसोबत अश्लील चाळे करत आहेत. विशेष म्हणजे गाडीवर हे सगळं सुरु असताना दुचाकी चालक वेगाने मोटर सायकल चालवत आहे. या घटनेने पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या रस्त्यावरून जाणारे येणारे सर्वजण त्यांच्याकडे पाहात होते, मात्र, त्यांनी ना त्यांची दुचाकी थांबवली ना अश्लील चाळे. आजू बाजूच्या लोकांनी या दोन जोडप्यांचे अनेक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये काढले. मात्र, दुनियाची फिकर न करता हे जोडपं त्यांच्या प्रेमात अखंड बुडालं होतं. पुण्यातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरतोय. दरम्यान, या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी आता नेटकरी करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments