इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तरुणीची १३ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी वानवडीतील परमार पार्क परिसरात राहण्यास आहे. सायबर चोरट्यांनी पाच महिन्यांपूर्वी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका आयुर्विमा कंपनीतील प्रतिनिधी असल्याची खोटी बतावणी चोरट्यांनी केली. तसेच एका खासगी कंपनीच्या आयुर्विमा पॉलिसीच्या वार्षिक भरण्याबाबत विचारणा करुन तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली. पॉलिसीतील काही रक्कम परताव्यापोटी देण्यात येणार असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती करून घेतली.
चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात तरुणीने वेळोवेळी १३ लाख ३२ हजार रुपये जमा केली. त्यानंतर चोरट्यांनी तरुणीला आणखीरक्कम भरण्यास सांगितली. तरुणीला संशय आल्याने तिने चौकशी केली असता फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.