इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः चलनी नोटांमुळे अनेक गंभीर आजार पसरू शकतात, असा धक्कादायक निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे. या संशोधनासाठी दूधवाले, पाणीपुरी विक्रेते, दवाखाने आणि पेट्रोल पंपांसारख्या ठिकाणाहून गोळा केलेल्या नोटा तपासण्यात आल्या. या तपासणीमध्ये 5 प्रकारचे फंगस आणि 4 प्रकारचे बॅक्टेरिया सापडले. हे सूक्ष्मजीव डोळ्यांचा संसर्ग, फुफ्फुसांचे आजार आणि टीबीसारखे गंभीर आजार पसरवू शकतात. राजस्थानच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या बायोटेक्नॉलॉजी लॅबने केलेल्या या संशोधनात, 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांवर धोकादायक बॅक्टेरिया आणि फंगस आढळले आहेत. यामुळे क्षयरोग (टीबी) सारखे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नोटांवर बॅक्टेरिया वाढण्यामागचे कारण म्हणजे, त्या कॉटन पेपरपासून बनतात, ज्यामुळे त्या सहज ओलावा शोषून घेतात. नोटा मोजताना थुकीचा वापर करणे हे या संसर्गासाठी अधिक धोकादायक ठरते. संशोधकांच्या मते, फंगल स्पोर्स 3 ते 4 वर्षे तर टीबीचे बॅक्टेरिया 24 ते 48 तास नोटांवर जिवंत राहतात
या धोक्यापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत. नोटा मोजताना थुकीचा वापर करू नका, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा आणि शक्य असेल तेवढे डिजिटल पेमेंट वापरा. कारण खिशातली तुमची नोट कथी तुम्हाला आजारी पाडेल, हे सांगता येत नाही.