इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड (पुणे): संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पालखी सोहळ्यालाकाल दिनांक 18 रोजी देहू येथून संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्या सुरुवात झाली असून यासाठी लाखो वारकऱ्यांनी हजेरी लावली असून हा पालखी सोहळा दौंड तालुक्यामध्ये दि. 23 जून यवत व 24 जून रोजी वरवंड या दोन ठिकाणी मुक्कामी असणार आहे त्याच पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी वरवंड, ता. दौंड येथे तयार करण्यात आलेल्या पालखी तळाची पाहणी आमदार राहुल कुल यांनी केली.
वारीच्या मार्गावरील स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, रस्त्यांची तयारी, पाणी, वीज, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून वारीच्या काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. यासाठी आमदार राहुल कुल यांनी सूचना दिल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापूराव दडस, तहसीलदार श्री. अरुण शेलार, पोलीस निरीक्षक श्री. नारायण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. हरिश्चंद्र माळशिकारे, श्री. मयूर सोनवणे, श्री. चेतन शिंदे, गटविकास अधिकारी श्री. महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी श्रीम. उज्वला जाधव, वन परीक्षेत्र अधिकारी श्री. राहुल काळे, माजी सरपंच श्री. गोरख दिवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय दिवेकर, बाजार समितीचे संचालक श्री. अशोक फरगडे, खरेदी विक्री संघांचे संचालक श्री. सचिन सातपुते यांच्यासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.