Wednesday, July 30, 2025
Homeक्राईम न्यूजदौंड तालुक्यात शेतमजूर महिलेचा विनयभंग; जातीवाचक शिवीगाळप्रकरणी शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल

दौंड तालुक्यात शेतमजूर महिलेचा विनयभंग; जातीवाचक शिवीगाळप्रकरणी शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः शेतमजूर पती कामावर न गेल्याच्या रागातून त्याच्या पत्नीचा हात पकडून विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना दौंड तालुक्यातील राहू परिसरात घडली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती हे दोघेही शेतमजुरी करत होते. पती काही कारणास्तव आरोपीकडे कामावर गेला नव्हता. याच कारणाने संतप्त झालेल्या आरोपी चंद्रकांत दत्तात्रेय तापकीर यांनी महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला आणि तिच्या जातीविषयी आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्द वापरले.

फिर्यादीत असेही नमूद आहे की, पीडित महिलेच्या पतीने यापूर्वी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरून आरोपीने महिलेवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. यावेळी तिच्या पतीलाही जातीवाचक शब्द वापरून अपमानित करण्यात आले.

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील विनयभंगाशी संबंधित कलमे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (SC/ST Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments