Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजदोघांचा एकत्र फोटो पाहून बिहारहून तो पुण्यात आला; अन् प्रियकराचा झोपेतच चिरला...

दोघांचा एकत्र फोटो पाहून बिहारहून तो पुण्यात आला; अन् प्रियकराचा झोपेतच चिरला गळा, पत्नीचाही काटा काढणार तितक्यात….

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन पत्नीच्या प्रियकराचा झोपेतच गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधनमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे.

राजीव कुमार आणि धीरज कुमार असे आरोपींची नावे आहेत. तर प्रवीणकुमार महतो असं मृत व्यक्तीचं नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजीव कुमार व त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. दोघे गेल्या तीन वर्षापासून विभक्त राहत असून त्यांची घटस्फोटासाठी कोर्टात केसही सुरू आहे. त्यातच पत्नीचे बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहिल्यामुळे आरोपी त्याच्यापर्यंत पोहोचले. यामुळे त्याने पत्नीच्या प्रियकराचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. आरोपी राजीव कुमार हा बिहारमध्ये सरकारी शाळेत शिक्षक आहे. त्याने तेथेच काम करणाऱ्या आपल्या मित्राला सोबत घेऊन पुणे गाठलं. पुण्यात आल्यावर त्याने पत्नीचा बॉयफ्रेंड प्रवीण कुमार महतो याचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर मध्यरात्री जाऊन झोपेत असतानाच त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली. हत्या करून मुंबईच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी आरोपी राजीव कुमारला पकडले.

याबाबत एसीपी सुनील कुराडे यांनी बोलताना सांगितलं की, ही हत्या धारदार शस्त्रानं करण्यात आली आहे. खून केल्यानंतर दोन्ही आरोपी मुंबईला पळून जात होते. वाटेत त्यांना कल्याण पोलिसांनी पकडलं. पिंपरी चिंचवड पोलीसांनी कल्याण पोलीसांच्या मदतीने अवघ्या नऊ तासांत या खूनाचा पर्दाफाश केल्यामुळे पुढील एक जीव वाचला. थोडासा उशीर झाला असता तर राजीवने बिहारमध्ये पोहचून पत्नीचाही खून केला असता. पिंपरी चिंचवड पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

राजीव कुमार हा बिहारमधील एका सरकारी शाळेत शिक्षक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपल्या गुन्ह्याची कबुली देताना आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, रात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रवीणकुमार झोपेत असताना त्याच्या मानेवर धारदार शस्त्रानं वार करून आरोपीनं पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपींना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments