Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजदुर्दैवी घटना...! जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; परिसरात भीतीचे...

दुर्दैवी घटना…! जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जुन्नर, (पुणे): पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे घडली आहे. रुपेश तान्हाजी जाधव असं बिबट्याच्या हल्यात मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रूपेशचे आजी-आजोबा तेजेवाडी येथील राजू शिंदे यांच्या विटभट्टीवर काम करतात. रुपेश हा आठदिवसांपूर्वी म्हैसगाव ता. राहुरी जि. अहमदनगर येथून सुट्टी साठी आजी आजोबा यांच्याकडे आला होता. पहाटे ५ वाजता तो प्रातः विधीसाठी गेला असता जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. त्यानंतर त्याला जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात ओढत नेले.

दरम्यान, रूपेशला सोडविण्यासाठी कुटुंबातील आणि आजूबाजूच्या नागरिकांनी आरडा-ओरडा केला. मात्र, बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी प्रदिप चव्हाण पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक रेस्क्यूटीम आणि वनविभागाच्या टिमने मुलाचा कसून शोध घेतला. त्यावेळी नरभक्षक बिबट्याही त्यांना आढळून आला. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments