Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजथेऊर येथील पूनावाला स्टड फार्मचे कर्मचारी मधुकर मोरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

थेऊर येथील पूनावाला स्टड फार्मचे कर्मचारी मधुकर मोरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे) थेऊर (ता. हवेली) येथील पूनावाला स्टड फार्मचे कर्मचारी मधुकर बळीराम मोरे (वय 50) यांचे बुधवारी (ता. 02) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

बुधवारी सकाळी उठल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून अंत्यविधी त्यांच्या मुळगावी मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथे करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments