Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजट्रकला धडकुन झालेल्या भीषण अपघातात मोटारचालकाचा जागीच मृत्यू; वाघोलीतील गाडेवस्ती चौकातील घटना

ट्रकला धडकुन झालेल्या भीषण अपघातात मोटारचालकाचा जागीच मृत्यू; वाघोलीतील गाडेवस्ती चौकातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोली, (पुणे) : ट्रकचालकाने अचानकपणे ट्रक वळवल्यानेझालेल्या भीषण अपघातात डुडुळगाव येथील मोटारचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नगर रस्त्यावर वाघोलीतील गाडेवस्ती चौकात शनिवारी (दि. 9 जून) दुपारी घडली. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज चंद्रकांत पाटील (वय ३७, रा. डुडुळगाव, आळंदी-मोशी रस्ता) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अनिरुद्ध अरुण पाटील (वय 28, रा. डुडुळगाव) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज पाटील हे मोटारीने नगर रस्त्याने निघाले होते. शनिवारी (ता. ७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गाडेवस्ती चौकात ट्रकचालकाने अचानक ट्रक वळवला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या युवराज पाटील यांच्या मोटारीची ट्रकला जोरदार धडक बसली. यात त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बागल करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments