इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मनोरंजन : कलाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. जेष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. गुरूवारी (२० जून) सायंकाळी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज अंधेरीतील ओशिवरा येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.
विवेक लागू यांनी मराठी चित्रपट, टीव्ही कार्यक्रम आणि रंगभूमीवर काम केले आहे. विवेक लागू यांनी रंगभूमीवरून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. विवेक यांना अनेक प्रसिद्ध नाटक आणि चित्रपटांसाठी पुरस्कार देखील मिळालेले आहेत.
विवेक लागू हे ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. विवेक लागू आणि रीमा लागू यांचे लग्न १९७८ मध्ये झाले होते पण काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. रीमा लागू यांनी त्यांच्या मुलीचे संगोपन एकट्याने केले. २०१७ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने रीमा लागू यांचे निधन झाले.