Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजजुन्या बोगद्याच्या तोंडाशी एसटी बस बंद पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

जुन्या बोगद्याच्या तोंडाशी एसटी बस बंद पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

खेड-शिवापूर, ता. 17: कात्रज जुन्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराच्यातोंडाला गुरुवारी (17 एप्रिल) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक एसटी बस नादुरुस्त होऊन बंद पडली. या बंद पडलेल्या बसमुळे संपूर्ण जुन्या कात्रज घाट रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

एसटी महमंडळाची एक बस कात्रजहून जुन्या कात्रज बोगद्यामार्गे साताऱ्याकडे निघाली होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही बस जुन्या कात्रज बोगद्याच्या प्रवेशद्वारा जवळ आली असता नादुरुस्त होऊन बंद पडली.

रात्रीची वेळ असल्याने पुण्याहून घराकडे परतणाऱ्या नागरीकांची संख्या घाट रस्त्यावर मोठी होती. मात्र बोगद्याच्या प्रवेश द्वाराजवळ बस बंद पडल्याने मागे घाट रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

वाहतूक पोलिसांची यंत्रणा घटनास्थळी पोचण्यास अडचण येत आहे. त्यामुळे जुन्या कात्रज घाट रस्त्यावर सुमारे पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments