इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्याच्या विविध भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन देखील केले आहे.
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद ?
निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार सर्वे नं. १५ ते ३०, धनकवडी सर्वे नं. २८, २९, ३०, ३४ ते ३७ आणि चैतन्यनगर, अक्षयनगर, राजमुद्रा सोसायटी, रिक्षा सोसायटी, विद्यानगरी, मोहननगर या ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे आंबेगाव पठार व धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामे करण्यात येणार असून यामुळे काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार, असल्याची माहिती देण्यात आली आहे.