Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजगणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरण्यास बंदी

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरण्यास बंदी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत : पुणे जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरण्यास बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात लेझर लाईटमुळे अनेक व्यक्तींच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन पुणे जिल्हा प्रशासनाने लेझरलँडला बंदी घालण्याचा आदेश पारित केला आहे. ०७ सप्टेंबर पासून सार्वजनिक गणेशोत्सव सण सुरु झाला आहे. तर १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीने गणेशोत्सवाची सांगता होणार आहे.

यानिमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपती विसर्जन मिरवणुकांचे आयोजन केले जात आहे. सदर मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येते, लेझर लाईट हे नागरिकांच्या डोळयांना घातक असून मिरवणुक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या डोळयांना या लेझर लाईटमुळे इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गणपती विसर्जन मिरवणुकीत शांततेचे व कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, तसेच नागरीकांच्या डोळयांना इजा होऊ नये. त्यासाठी लेझर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण गणेशोत्सव विसर्जन मिरवणूका शांत वातावरणात पार पाडला जावा. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, मिरवणूकांमध्ये नागरीकांच्या डोळयांच्या सुरक्षेसाठी लेझर लाईटचा वापर कटाक्षाने टाळावा.

नागरीकांच्या आरोग्याचे दृष्टीने १५ ते १७ सप्टेंबर पर्यंत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत अप्पर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेश निर्गमित केले आहेत. सदर आदेशाचा भंग करुन गणपती विसर्जनाचे मिरवणूकीमध्ये लेझर लाईटचा वापर करताना आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments