Saturday, November 23, 2024
Homeक्राईम न्यूजखोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत उकळली खंडणी; तोतया पत्रकारासह एकाला ठोकल्या बेड्या...

खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत उकळली खंडणी; तोतया पत्रकारासह एकाला ठोकल्या बेड्या…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिक्रापूर : मुलीच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवुन 25 हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. सुमित लक्ष्मण थोरात (वय 32), विशाल नवनाथ ढेसले (वय 31 दोघेही रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत श्रीकांत तुकाराम शिंपले (वय 25, मुळ रा. कुंबेफळ, ता. आंबेजोगाई, जि. बीड, सध्या रा. रांजणगाव गणपती, संकल्पसिटी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती-भांबार्डे रोडलगत असलेल्या बिल्डींगमध्ये फिर्यादी श्रीकांत शिंपले यांना आरोपी सुमित थोरात व प्रविण जगताप यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सात ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास प्लंबिंगचे कामासाठी बोलावुन घेत काठीने मारहाण केली. तसेच त्या ठिकाणी एका मुलीला बोलावुन घेत तु हिची छेडछाड करुन तिचा मोबाईल आणि पैशाची चोरी केली असा खोटा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देवुन 25 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

त्यानंतर त्याच्याकडील मोबाईलमधील स्कॅनरवरती खंडणीची रक्कम फिर्यादीस पाठविण्यास सांगीतली. ही रक्कम त्याचे साथीदार आरोपी विशाल नवनाथ देसले व अभय रामटेके सर्व (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचे मदतीने संगनमत करुन घेतली. याप्रकरणी श्रीकांत शिंपले याच्या तक्रारीवरुन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. तपास पथकाने घडलेल्या प्रकाराबाबत सत्यता पडताळून आरोपीचा सहभाग निष्पन्न करुन आरोपी सुमित थोरात, विशाल ढेसले यांना ३ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आले. त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने आरोपीना ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीकडुन 25 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून आरोपी प्रविण जगताप आणि अभय रामटेके यांचा शोध सुरु आहे.

पत्रकार असल्याचे सांगत उकळली खंडणी….

आरोपी सुमित थोरात हा रांजणगाव गणपती येथील स्थानिक रहिवाशी असुन त्याने स्वतःला पत्रकार असल्याचे तसेच त्याच्या पोलीसांशी ओळखी आहेत, असे फिर्यादीस सांगुन त्यास विनयभंगाच्या खोट्या केसमध्ये अडकविण्यांची भिती दाखवत खंडणीची मागणी करत २५ हजार रुपये खंडणी घेतली. त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार सुभाष गारे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, तेजस रासकर, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, चालक पोलिस हवालदार पांडुरंग साबळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments