Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजखळबळजनक...! प्रेमसंबंध कायम ठेवण्याचा दबाव; विवाहितेची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा

खळबळजनक…! प्रेमसंबंध कायम ठेवण्याचा दबाव; विवाहितेची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लग्न झाल्यानंतर देखील त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. तिचा प्रियकर प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी तिच्यावर सतत दबाव आणत होता. तिला तो दबाव असाह्य झाल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना १ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास रेंजहिल्समध्ये घडली आहे.

या प्रकरणी विवाहितेच्या दिराने खडकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारुती पाटील (वय-३८, रा. रेंजहिल्स, खडकी) यांच्याविरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वहिनी हिचे आरोपी मारुती पाटील याच्याबरोबर मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाबाबत विवाहितेच्या घरात माहिती झाले होते. त्यामुळे तिने ते प्रेमसंबंध पूर्णपणे बंद केले होते. असे असतानाही मारुती हा गेल्या मार्च महिन्यांपासून प्रेमसंबंध पुन्हा सुरु करण्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकत होता. तसेच फिर्यादी यांच्या वहिनीला कॉल आणि मेसेज द्वारे धमकी देत होता.

दरम्यान, त्याच्या याच त्रासाला कंटाळून विवाहितेने १ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments