Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजखळबळजनक...! इंदापूर शहरात तरुणावर गोळीबार; पोलीस घटनास्थळावर दाखल

खळबळजनक…! इंदापूर शहरात तरुणावर गोळीबार; पोलीस घटनास्थळावर दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : इंदापूर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात महाविद्यालयासमोर एका युवकावर अज्ञाताकडून गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. बारामतीमध्ये एका महाविद्यालयीन युवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर सायंकाळी इंदापुरात गोळीबाराची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

राहुल अशोक चव्हाण (वय-२५ वर्षे रा. शिरसोडी, ता. इंदापूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. ही घटना शहरातील जुना पुणे-सोलापूर महामार्गावरील महाविद्यालयासमोर आज (दि. ३०) रात्री पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. राहुल चव्हाण या युवकाच्या पाठीवर चार गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे.

दरम्यान, पावणेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. नेमक्या याच संधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुल याच्यावर गोळ्या झाडल्या. सतत रहदारी असणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments