Monday, July 7, 2025
Homeक्राईम न्यूजखडकी हादरले ! रेंजहिल्स येथे तरुणावर जीवघेणा हल्ला; मुख्य आरोपीला पोलिसांनी ठोकल्या...

खडकी हादरले ! रेंजहिल्स येथे तरुणावर जीवघेणा हल्ला; मुख्य आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः शहरातील खडकी परिसरात एका जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. भांडण लावल्याच्या संशयावरून एका टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी खडकी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका मुख्य आरोपीला अटक केली आहे, तर इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील ३२ वर्षीय संदीप कदम यांच्यावर हा हल्ला झाला आहे. संदीप कदम यांनीच या संदर्भात खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी औंध येथील ५० वर्षीय राजू भिकान मोरे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू मोरे आणि संदीप कदम हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून, काही दिवसांपूर्वी राजू मोरे यांचा एका केटरर्ससोबत वाद झाला होता. दरम्यान, भांडण संदीपने लावले असल्याचा संशय राजू मोरेला होता. याच संशयातून रेंजहिल्स परिसरात संदीप कदमवर धारदार शस्त्रांनी वार केले, ज्यामुळे संदीप गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले करत आहेत. या हल्ल्यामुळे खडकी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments