इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजच्या स्टार क्रिकेटपटूवर लैंगिक छळाचाआरोप झाल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. खेळाडूवर ११ पीडित महिलांनी आरोप केले आहेत. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, त्या क्रिकेटपटूचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र, हा खेळाडू सध्याच्या वेस्ट इंडिज संघात असल्याचे सांगितले जात आहे.
स्पोर्ट्समॅक्स टीव्हीने याबद्दल एक वृत्त दिले आहे. यासंबंधित त्यांनी क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) शी संपर्क देखील साधला मात्र, बोर्डाने या प्रकरणाची माहिती नसल्याचं सांगत यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळलं आहे.
बोर्डाला या आरोपांची माहिती आहे का? जर त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी कोणती पावले उचलली आहेत? अशी प्रश्न वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला विचारण्यात आली. यावर क्रिकेट वेस्ट इंडिजचे अध्यक्ष किशोर शैलो यांनी सांगितले की, बोर्डाला या प्रकरणाची माहिती नाही. त्यामुळे यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, या क्रिकेटपटूवर ११ महिलांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात एका किशोरवयीन मुलीचा देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.