इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील जैपान मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मध्ये चोरी केल्याची घटना घडली आहे. फ्रिज बनवण्यासाठी लागणारे तांब्याच्या धातुचे वेगवेगळे पाटर्स तसेच ११५० किलो वजनाची व २२७६७ नग पाईप असा एकूण ५ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना ११ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी कमलेश रमेशभाई पांचाल (वय-५६, रा. आयव्हीवाय अपार्टमेंट, जेएसपीएम कॉलेज जवळ, वाघोली) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांचाल यांना ११ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता कंपनीचे प्लॉट हेड प्रविण रामेश्वर गिरी यांनी फोन करून या घटनेची माहिती दिली. जैपान कंपनीच्या प्रोडक्शन विभागाची लोखडी जाळी व खिडकी तोडुन आत प्रवेश करून स्टोअरच्या जागेतून तांब्याच्या कॅपिलरीची चोरी केली..
फ्रिज बनविण्याकामी लागणारे तांब्याचे धातुची अंदाजे ११५० किलो वजनाची २२७६७ नग पाईप (कॅपिलरी) एकूण साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.