इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : रेल्वे मार्गावरील केडगाव परिसरात 39 वर्षीय एका तरुणाने रेल्वेसमोर येवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला आहे. ही घटना सकाळी 9.25 च्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुण शिरूर तालुक्यातील आंबळे येथील रहीवाशी आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव अमोल अशोक निंबाळकर असे आहे. या व्यक्तीने हुतात्मा एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या इंजीनसमोर येवून त्याने आत्महत्या केली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून, अद्याप आत्महत्या केल्याचे कारण समजलेले नाही. या घटनेचा पुढील तपास दौंड रेल्वे पोलीस करत आहेत.