Friday, July 4, 2025
Homeक्राईम न्यूजकॅन्सरग्रस्त आजीला फेकले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, नातवाच्या कृत्याने गोरेगावात खळबळ

कॅन्सरग्रस्त आजीला फेकले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, नातवाच्या कृत्याने गोरेगावात खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबईः मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात ६० वर्षीय कॅन्सरग्रस्त आजीला तिच्याच नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अक्षरशः फेकून दिल्याची क्रूर घटना उघडकीस आली आहे. यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचे नाव असून, सध्या त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची अवस्था अत्यंत नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्वचेच्या कर्करोगामुळे त्या पूर्णपणे अशक्त झाल्या आहेत. ही घटना पोलिसांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तात्काळ धाव घेऊन यशोदा गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, यशोदा गायकवाड या नातवासोबत मालाड परिसरात आपल्या राहत होत्या. नेमके कारण स्पष्ट नसले तरी, त्यांच्या नातवाने त्यांना कचराकुंडीजवळ सोडून पळ काढला. या हृदयद्रावक घटनेचे साक्षीदार असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यामुळेच आजीला वेळेत मदत मिळून तिच्यावर उपचार सुरू होऊ शकले. आजीच्या आजारपणामुळेच तिला अशाप्रकारे टाकून दिल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सध्या यशोदा गायकवाड यांच्या कुटुंबाचा शोध सुरू असून, त्यांच्या नातवाला लवकरच ताब्यात घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. अशा अमानवी घटनेनंतर आरोपीवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments