Saturday, June 7, 2025
Homeक्राईम न्यूजकामथडी येथील खुटवडवस्ती येथे विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

कामथडी येथील खुटवडवस्ती येथे विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भोर (पुणे): भोर तालुक्यातील कामथडी येथील खुटवडवस्तीमध्ये बुधवारी (दि. 14 मे) रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. येथील रहिवासी राजेंद्र चंद्रकांत खुटवड (वय 36) यांना घरासमोरील पाण्याची मोटार सुरू करत असताना अचानक विजेचा शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

विजेचा शॉक बसल्यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्यांना नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दुःखद घटनेने खुटवड कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच, राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

राजेंद्र खुटवड यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, विजेच्या साधनांच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृतीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments