Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजकात्रजमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

कात्रजमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः कात्रज परिसरातील वंडर सिटीजवळ रविवारी (दि. ४) दुपारी भरधाव ट्रकची धडक बसून दुचाकीस्वार महिला मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी घडली. अपघातामध्ये आणखी एक महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लहूबाई अश्रृवा वाघमारे (वय ४९, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द, कात्रज) हे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. अपघातात प्रियंका राऊत (वय ३३) जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पसार झालेला ट्रक चालक नीलेश चांदगुडे (वय ३८, रा. इंदापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहूबाई रविवारी दुपारी एकच्या सुमारास दुचाकीवरून कात्रज बाह्यवळण मार्गावरुन नवले पुलाकडे चालल्या होत्या. वंडर सिटीजवळ भरधाव ट्रकची त्यांना धडक बसली. त्यानंतर, ट्रकचालकाने त्यांना सुमारे २०० मीटर फरफटत नेले. तेथून निघालेल्या दुचाकीस्वार प्रियंका राऊत यांनाही ट्रकची धडक बसली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लहुबाई यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान त्या मरण पावल्या. अपघातानंतर, ट्रकचालक चांदगुडे पसार झाला होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments